या प्रकरणी पीडित तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात आरोपी अर्जुन मोतीराम मुंडे (३२) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुणे । नगर सह्याद्री
लैंगिक अत्याचाराची पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून तरुणाने मुलीचे अश्लिल व्हिडीओ क्लिप तरुणीच्या आईला आणि त्यांच्या नातेवाईकांना पाठवले. तसेच या तरुणाने मुलीला ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार वाघोली परिसरामध्ये घडला आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात आरोपी अर्जुन मोतीराम मुंडे (३२) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यात मैत्रीचे संबंध होते. आरोपीने एप्रिल महिन्यात आपला वाढदिवस असल्याचे सांगून तरुणीला लॉजवर घेऊन जात जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले होते.
याचाच राग आरोपीने मनामध्ये धरून ९ ऑगस्ट रोजी फिर्यादी तरुणी ही रस्त्याने जात असताना तिचा पाठलाग केला. त्यानंतर तिच्या आई आणि नातेवाईकांच्या व्हाट्सअप वर अश्लील व्हिडिओ पाठवले. त्यानंतर मी तुझ्या मुलीला व मुलाला जीवे मारून टाकेन अशी धमकी देण्यात आली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात कलम ३५४ (ड), कलम ५०६ सह आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक गोडसे अधिक तपास करत आहे.
COMMENTS