अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना दुर्दैवी आहे. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना दुर्दैवी आहे. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. राज्यात युतीचे सरकार असून महिला आणि मुलींच्या सुरक्षेला आघाडी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गोंडगावला भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी त्या बोलत होत्या.
राज्यात कुठेही महिलांच्या छेडछाडीची घटना घडल्यास आरोपींना सोडले जाणार नाही. आरोपींना शिक्षा करणे ही सरकारची भूमिका असल्याचेही ते म्हणाले. स्वत: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः अशा प्रकरणांमध्ये जातीने लक्ष घालून असतात. त्यामुळे भविष्यात राज्यातील मुली भयमुक्त वातावरणात जगतील; असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
COMMENTS