पुण्यामधील दौंड तालुक्यात कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या राकेश जगताप आणि सचिन नलावडे या दोन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे । नगर सह्याद्री
अलीकडील काळामध्ये कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील कोयता घेऊन दहशत माजविली जात असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पुण्यामधील दौंड तालुक्यात कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या राकेश जगताप आणि सचिन नलावडे या दोन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दौंड शहरामध्ये हातात धारदार कोयता घेऊन शहरातील रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या दोघांविरोधात दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी राकेश जगताप आणि सचिन नलावडे हे दोघे दौंड शहरातील रस्त्यावर हातात कोयता घेऊन मोटरसायकलवर फिरत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
COMMENTS