माजी आमदार, खासदार, नगरसेवक, राज्यपाल, पंतप्रधान, राष्ट्रपती आदींना लागू असलेली पेन्शन सरकारने लवकर बंद करावी.
पुणे । नगर सह्याद्री
माजी आमदार, खासदार, नगरसेवक, राज्यपाल, पंतप्रधान, राष्ट्रपती आदींना लागू असलेली पेन्शन सरकारने लवकर बंद करावी. अशा प्रकारचे फ्लेक्स धायरी परिसरात झळकत आहेत. त्यामुळे पुन्हा पेन्शनचा विषय नागरिकांमध्ये चर्चिला विषय बनला आहे.
सरकार नेत्यांच्या पेन्शनवर कोट्यवधी रुपये खर्च करते परंतु राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांची पेन्शन सरकारने बंद करून त्यांच्यावर अन्याय करत आहे. त्यामुळे माजी आमदार आणि खासदारांची पेन्शन बंद करावी, अशी मागणी फ्लेक्सच्या माध्यमातून आम आदमी पार्टीचे पुणे शहर प्रवक्ते धनंजय बेनकर यांनी केली आहे.
दिल्ली आणि पंजाबसारख्या राज्यात माजी आमदार आणि खासदार यांची पेन्शन रद्द केली आहे. त्यामुळे तेथील सरकारचे कोट्यवधी रुपये वाचत आहेत. या पैशाचा विनियोग मुलांच्या शिक्षणासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी या पैशाचा वापर होत आहे. त्यामुळे तेथील राज्य प्रगती पथावर आहे. याच धर्तीवर राज्यातील माजी नेत्यांची पेन्शन बंद करावी अशी मागणी केली जात आहे.
COMMENTS