शेतकर्यांच्या उपस्थितीमध्ये अॅड. काळे यांचा सत्कार व शेतकर्यांसाठी मार्गदर्शनपर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
अॅड. प्रतीक्षा काळे | पारनेरमध्ये शेतकरी चर्चा सत्राचे आयोजन
सुपा | नगर सह्याद्री
शिवपाणंद शेत रस्ते संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. तालुक्यातील सर्व रस्ते ६० दिवसांमध्ये खुले करावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. पिढ्या ना पिढ्या शिवपाणंद शेत रस्त्यांची मोजणी व हद्द निश्चित नसल्याने शेतकरी बांधवांमध्ये रस्त्या संदर्भात निर्माण होणारे वाद वाढत होते. आता उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय दिल्याने ही समस्या सोडविण्याची जबाबदारी तहसीलदारांची असल्याची प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयातील विधीतज्ज्ञ अॅड. प्रतीक्षा काळे यांनी व्यक्त केली. शिव पाणंद शेतरस्त्यांच्या संदर्भातील शेतकर्यांची बाजू अॅड. प्रतीक्षा काळे यांनी उच्च न्यायालयामध्ये मांडून न्यायालयातील ही लढाई जिंकली.
या बद्दल पारनेर येथे दि. ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी शिवपाणंद शेत रस्त्यांच्या संदर्भात अडचणीत असलेल्या शेतकर्यांच्या उपस्थितीमध्ये अॅड. काळे यांचा सत्कार व शेतकर्यांसाठी मार्गदर्शनपर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. प्रतीक्षा काळे बोलत होत्या. यावेळी अॅड. काळे यांनी शेतकर्यांच्या समस्या ऐकून घेत त्यावर मार्गदर्शन केले. शिवपाणंद व शेत रस्त्यांच्या समस्या कशा पद्धतीने सोडवल्या जातील ते सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संजय वाघमारे, शिवपाणंद शेत रस्त्याच्या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये लढा उभारण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला असे पारनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, पारनेर बाजार समितीचे संचालक महेश शिरोळे, संजय कनिछे, बाळासाहेब औटी, भास्कर शिंदे, वृक्षमित्र सचिन शेळके, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कोरडे, माजी सैनिक काशिनाथ नवले, सेवा निवृत्त वरिष्ठ अधिकारी भास्कर चेमटे, पत्रकार गणेश जगदाळे, अनिल खुमने, दशरथ वाळूंज, कैलास झावरे, विजय सरडे, सतिष शिरोळे आदी उपस्थित होते.
COMMENTS