अॅड. सोनवणे, शिंदे, अॅड. तुषार साळवे, अॅड कांचन गायकवाड, अशोक जाधव, सुरेश उबाळे, राजेंद्र पाडळे तसेच रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्षाचे पोलीस निरीक्षकांना निवेदन
पारनेर | नगर सह्याद्री
श्रीरामपूर तालुयातील हरेगाव येथील चार मागासवर्गीय युवकांना अर्धनग्न करून आणि झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण केलेल्या आरोपींवर कठोरातील कठोर शिक्षा करण्याकरिता पारनेर येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पारनेर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, तालुका उपाध्यक्ष किरण खुपटे, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पवार, अॅड. सोनवणे, शिंदे, अॅड. तुषार साळवे, अॅड कांचन गायकवाड, अशोक जाधव, सुरेश उबाळे, राजेंद्र पाडळे तसेच रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनात पुढे म्हटले की, गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हरेगाव येथील चार मागासवर्गीय तरुणांना शेळी आणि चार कबुतरे चोरल्याच्या संशयावरून हरेगाव-उंदीरगाव शिवारात युवराज नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे यांनी शेतातील विहिरीकडे नेत. तिथे त्यांना अर्धनग्न करून हात-पाय बांधून उलटे टांगून अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने संपुर्ण राज्यातून दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या घटनेबाबत निषेध नोंदवत अनेक दिवसापासून या - ना - त्या कारणावरुन काही समाजकंटकाकडून दलित समाज्यात प्राण घातक हल्ले होत असल्याने समाज्यात दुषीत वातावरण निर्माण करत असल्याने हे समाज्यासाठी धोयाचे असून अशा संमाजकंटकांना त्वरीत शासन झाले पाहिजे. या मागणी करिता पारनेर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
COMMENTS