तीन मुलासह एका मुलीचा समावेश आहे. सायंकाळी ६ च्या सुमारास शाेधकार्य मोहिमेस सुरवात करण्यात आली. परंतु शाेधकर्त्यांच्या हाती काहीही गवसले नाही.
नागपूर । नगर सह्याद्री
वाकी परिसरामध्ये फिरायला गेलेल्या सहा जणांपैकी चार जणांचा कन्हान नदीच्या डाेहात बुडून मृत्यू झाला आहे. घडलेली घटना गुरुवारी दुपारी तीनच्या दरम्यान घडला. यामध्ये तीन मुलासह एका मुलीचा समावेश आहे. सायंकाळी ६ च्या सुमारास शाेधकार्य मोहिमेस सुरवात करण्यात आली. परंतु शाेधकर्त्यांच्या हाती काहीही गवसले नाही.
विजय ठाकरे (१८), साेनिया मरसकाेल्हे (१७), अंकुश बघेल (१७), अर्पित पहाळे (१९) असे पाण्यामध्ये बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. साक्षी कनाेजे (१८), मुस्कान राणा (१८) हे बचावले असून हे सहाही जण मित्र दाेन माेटारसायकलींनी ट्रिपल सीट गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वाकी येथे फिरायला गेले होते. त्यानंतर त्यांनी ताजुद्दीनबाबांच्या दर्ग्यात दर्शन घेतले आणि कन्हान नदीच्या काठावर फिरायला गेले होते.
विजय पाेहण्यासाठी पाण्यामध्ये उतरला आणि गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचविण्यासाठी आधी साेनिया, नंतर अंकुश व अर्पित पाण्यामध्ये उतरले आणि बुडाले. घटनेची माहिती मिळताच खापा पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शाेधकार्य शुक्रवारी (दि.१८) सकाळी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार मनाेज खडसे यांनी दिली.
COMMENTS