मुंबई / नगर सह्याद्री SSC-HSC Results Announced : इयत्ता दहावी, बारावी मुख्य परीक्षेत अपयश आल्यास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, तसेच ...
मुंबई / नगर सह्याद्री
SSC-HSC Results Announced : इयत्ता दहावी, बारावी मुख्य परीक्षेत अपयश आल्यास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणश्रेणीत सुधारणा करावीशी वाटते त्यांच्यासाठी घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज (28 ऑगस्ट) दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन प्रणालीद्वारे जाहीर झाला आहे.
विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पहावयाचे असतील तर ‘www.mahresult.nic.in’ या संकेतस्थळावर जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचे मार्क्स पाहता येतील. याची प्रिंट देखील तुम्हाला घेता येईल.
पुरवणी परीक्षेच्या ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तर पत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ :
गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संकेतस्थळ
दहावीसाठी : http://verification.mh-ssc.ac.in
बारावीसाठी : http://verification.mh-hsc.ac.in
COMMENTS