शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पुणे । नगर सह्याद्री
वानवडी परिसरामधील सोळंके ज्वेलर्स या दुकानाला आज पहाटेच्या दरम्यान आग लागल्याने दुकानातील फर्निचर सोबतच शोकेसमध्ये ठेवलेल्या चांदीच्या मूर्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चांदीच्या मूर्ती आगीत सापडल्याने त्या वितळून त्यांचा गोळा झाला आहे. लॉकरमध्ये सोन्याचे दागिने ठेवले असल्याने दागिन्यासागे नुकसान झाले नाही. याप्रकरणी आग विझविताना काच लागल्याने निलेश वानखेडे हे जवान जखमी झाले.
वानवडी येथील परमार पार्क सोसायटीत सोळंके ज्वेलर्स या दुकानाला सकाळी पावणे सातच्या सुमारास ही आग लागली होती. दुकानांमधून धूर येत असलेला पाहून घटनास्थळावरील नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. कोंढवा अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. काही वेळातच आग विझवण्यास अग्निशामक दलास यश आले.
शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. चांदीच्या वस्तू आगीत वितळून त्यांचा गोळा झाला. तो मालकाकडे सोपविण्यात आला आहे. तसेच सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवले असल्याने त्यांना कोणतीही हानी झाली नाही. कोंढवा केंद्राचे अधिकारी कैलास शिंदे, तांडेल महादेव मांगडे, फायरमन सागर दळवी, निलेश वानखेडे, दिनेश डगळे, चालक सत्यम चौखंडे यांनी ही आग विझवण्यास मदत केली.
COMMENTS