रोज मांसाहार करतात तर तुम्ही हृदयविकार, मधुमेह आणि न्यूमोनिया सारख्या 9 आजारांना बळी पडू शकता.
चिकन, मटण खाणारे अनेक शौकीन आहेत. काही लोकांना मांसाहाराची इतकी आवड असते की ते रोज म्हटलं तरी मांसाहार करू शकतात. तुम्हीही मांसाहाराचे शौकीन असाल तर ही बातमी वाचाच. शरीराला मजबूत करण्यासाठी मांस हे प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत आहे. ( Side Effects of Meat )
यात लोह, जस्त, जीवनसत्त्वे आणि आवश्यक फॅटी ऍसिडस् भरपूर प्रमाणात असते आणि आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असते. पण जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल जे रोज मांसाहार करतात तर तुम्ही हृदयविकार, मधुमेह आणि न्यूमोनिया सारख्या 9 आजारांना बळी पडू शकता.
9 प्रकारच्या रोगांचा धोका
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या बीएमसी मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, जर एखाद्या व्यक्तीने रेड मीट, प्रोसेस्ड मीट आणि पोल्ट्री मीट आठवड्यातून 3 दिवस किंवा त्याहून अधिक काळ खाल्ले तर त्यांना धोका असतो. 9 विविध प्रकारचे आजार वाढतात. रेड मीट आणि प्रोसेस्ड मीटच्या अतिसेवनामुळे पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका असल्याचे यापूर्वी झालेल्या अनेक अभ्यासांतून आणि संशोधनातून सिद्ध झाले आहे. परंतु या संशोधनात असे समोर आले आहे की, मांसाच्या अतिसेवनाचा थेट संबंध त्या आजारांशी आहे जे अगदी कॉमन आजारात देखील मोडतात.
विविध आजारांचा धोका
जे लोक अनप्रोसेस्ड रेड मीट व प्रोसेस्ड मीट जादा सेवन करतात त्यांना आईस्कैमिक हार्ट डिजीज, न्यूमोनिया, डायव्हर्टिक्युलर डिजीज, कोलन पॉलीप्स आणि मधुमेहाचा धोका जास्त होता. जे लोक जास्त पोल्ट्री मांस खातात त्यांना गॅस्ट्रो-एसोफेजियल रिफ्लक्स डिजीज गॅस्ट्र्रिटिस, ड्युओडेनाइटिस, डायव्हर्टिक्युलर डिजीज, पित्त मूत्राशय रोग आणि मधुमेहाचा धोका जास्त होता.
दररोज 70 ग्रॅम अनप्रोसेस्ड रेड मीट आणि प्रक्रिया केलेले मांस खाणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका 15 टक्के आणि मधुमेह होण्याचा धोका 30 टक्के जास्त असतो. या संशोधनातून असे समोर आले आहे की, तुमच्या शरीराला जेवढे आवश्यक आहे तेवढेच मांस खावे जास्त सेवन केले तर शरीराचे नुकसान होऊ शकेल असे समोर आले आहे.
COMMENTS