सलमान अन्सारी, सर्फराज अन्सारी अशी बुडून बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे आहेत.
मुंबई । नगर सह्याद्री
उल्हास नदीवर स्नान करण्यासाठी गेलेले दोन तरुण उल्हास नदीत बुडून बेपत्ता झाले आहेत. हे तरुण उल्हासनगर मधील शांतीनगर परिसरामधील आहेत. दोन्ही तरुणांचा शोध अग्निशमक दलाचे जवान करत आहेत. घडलेली घटना शुक्रवारी दुपारच्या दरम्यान घडली आहे. सलमान अन्सारी, सर्फराज अन्सारी अशी बुडून बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे आहेत.
हे दोन्ही तरुण शुक्रवारी दुपारी मोहने जवळील उल्हास नदीवर स्नान करण्यासाठी व कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुवून झाल्यानंतर पोहण्याचा मोह न आवरल्याने ते पोहण्यासाठी नदीमध्ये उतरले. त्यानंतर ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. दूरवर असलेल्या नागरिकांना नदीत दोन जण वाहून जात असल्याचे दिसल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मुलांना वाचवण्यासाठी नागरिकांनी नदी काठी धाव घेतली, तोपर्यंत तरुण बेपत्ता झाले होते. घटनेची तात्काळ माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमक विभाग व पोलिसांना देण्यात आली. तात्काळ अग्निशमक विभागाचे अधिकारी घटनास्थळी येऊन बेपत्ता तरुणांचा शोध घेत आहेत.
COMMENTS