शाळेतील 10 पैकी नऊ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश केल्याने आपणच याला जबाबदार असल्याने हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
पुणे । नगर सह्याद्री
दौंड तालुक्यातील होले वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकाने औषध पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या शाळेतील 10 पैकी 9 विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश केल्याने आपणच याला जबाबदार असल्याने हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले आहे. अरविंद देवकर असे या शिक्षकांचे नाव असून त्यांनी विष पिण्यापुर्वी चिट्टी लिहून ठेवली होती.
जून महिन्यात सुरुवातीचे तेरा दिवस मी विद्यार्थ्यांना अध्यापन करू शकलो नाही, शाळेमध्ये एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून लेखन विद्यार्थ्यांशी ओळख, गप्पा, गाणी, गोष्टी, मैदान साफसफाई या कामामध्येच माझा संपूर्ण वेळ गेला. त्यामध्येच मी मुलांकडून शौचालय साफ करून घेणे ही गोष्ट पालकांना खटकली. त्यामुळे पालकांनी जाब विचारल्याने मी निराशेमध्ये गेलो असल्याचे त्यांनी चिट्टीमध्ये लिहले आहे.
19 वर्ष सेवा झाली असल्याचे अरविंद देवकर यांनी चिट्ठीमध्ये नमूद केले आहे. यापूर्वीच्या शाळेत चांगले सहकारी शिक्षक लाभल्याने सेवा चांगली झाली, परंतु एक शिक्षकी असल्याने कामाच्या गोंधळात मी सुरुवातीला बावरून गेलो. त्यामुळे मला पालक वर्गाची मने जिंकता आली नाहीत असे म्हणून त्यांनी औषध प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान आठ ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला.
COMMENTS