पुलावरून पाणीही वाहत असताना दुचाकी चालवत नेण्याचे धाडस दोघांच्या अंगलट येऊन दोघांचा मृत्यू झाला आहे.
हिंगणी । नगर सह्याद्री
राज्यामध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अशातच पुलावरून पाणीही वाहत असताना दुचाकी चालवत नेण्याचे धाडस दोघांच्या अंगलट येऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. घडलेली घटना बोरधरण परिसरात सोमवारी रात्रीच्या दरम्यान घडली.
अंकुश नागो चौधरी (६२), इसराईल इस्माईल पठाण (५२) अशी मृत्यू रुग्णाची नावे आहेत. अंकुश आणि इसराईल हे सोमवारी काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना येताना ते दुचाकीने सालई-बोरधरणमार्गे हिंगणीच्या दिशेने येत होते. परंतु बोर धरणातील पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत असल्याने सालई ते बोरी मार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते.
हा पूल उतारावर आणि धरणाशेजारी असल्याने वाहत्या पाण्याला प्रचंड प्रवाह असल्यामुळे रात्री दोघे दुचाकीने हाच पूल पार करण्याचा प्रयत्न करीत असताना ते दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. मंगळवारी सकाळी बोरी येथील काही नागरिक नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी गेल्यावर दोघांचे मृतदेह आढळून आले. माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
COMMENTS