उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी फडतडे याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मुंबई । नगर सह्याद्री
मी पोलिस आहे असे धमकावत तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रशांत पाटील (रामवाडी, पेण) यांना पेण पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.
सतरा वर्षांची अल्पवयीन तरुणी ट्री हाऊस शाळेकडून पेणकडे येत असताना रिक्षा चालक प्रशांत पाटील याने तरुणीला रिक्षात बसवून तिचे मोबाइलमध्ये फोटो काढून घेतले. त्यानंतर पेण खोपोली मार्गावरील धामणी येथील एका बंद पडलेल्या कंपनीत घेऊन जाऊन तिला तिची प्रेग्नन्सी टेस्ट करण्यास जबरदस्ती केली. मुलीने नकार दिल्याने आपल्या मोबाइलवर अश्लील व्हिडीओ दाखवून मुलीवर अत्याचार केला.
याप्रकरणी पेण पोलिस ठाण्यात आरोपी प्रशांत पाटील याला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता २३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी फडतडे याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
COMMENTS