नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहाचा आग्रह धरणाऱ्या मुलीची वडिलांनी निर्घृण हत्या केली.
मुंबई / नगर सह्याद्री -
नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहाचा आग्रह धरणाऱ्या मुलीची वडिलांनी निर्घृण हत्या केली. यानंतर मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तब्बल ८ दिवसांनी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी मृत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मृत तरुणीचे वय अवघे १६ वर्षे आहे. मुखेड तालुक्यातील राजुरा तांडा येथे राहणाऱ्या एका नातेवाईकासोबत तिचे प्रेमसंबंध होते. मुलीच्या वडिलांना या प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी विरोध केला. तरी देखील मुलीने नातेवाईकातील त्या मुलासोबत लग्न करण्याचा हट धरला होता.
रागाच्या भरात आरोपी पित्याने 2 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास मुलीच्या मानेवर आणि हातावर कोयत्याने वार केले. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी मुलीचा मृतदेह शेतात नेऊन पुरावा नष्ट करण्यासाठी जाळून टाकला.
त्यानंतर घरातील रक्ताचे डाग पाण्याने धुवून कोयत्याला उसाच्या शेतात फेकून दिले. या घटनेची माहिती दिल्यास पत्नीला जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली होती. दरम्यान, माझी मुलगी आजारी पडली,होती. आजाराला कंटाळून तिने गळफास लावून घेतला, त्यानंतर आरोपी वडिलांनी घाईघाईने तिचा अंत्यसंस्कार केला.
अखेर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून हत्येचा उलघडा केला. मृत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके करीत आहेत. एका बापाने आपल्याच मुलीची एवढ्या निर्दयीपणे हत्या केली हे पाहून हृदय पिळवटून जाते.
मुलीच्या मृत्यूनंतर गावात विविध चर्चा रंगल्या. पोलिसांनाही या घटनेचा संशय आला. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. या घटनेचा पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान मुक्रमाबाद पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. पोलिसांनी अनेक गोपनीय जबाब नोंदवले.
९ ऑगस्ट रोजी काही लोकांना ताब्यात घेऊन थंडीची चौकशी करण्यात आली. मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या जागेची तपासणी करून हाडांचे नमुने आणि राख प्रयोगशाळेत पाठवण्यात आली. यानंतर मृत मुलीच्या आईला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ऑनर किलिंगचे प्रकरण समोर आले.
COMMENTS