७ अल्पवयीन मुलांनी मिळून एका अल्पवयीनाचा खून केला आहे. या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
महाराष्ट्रत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचाही मोठ्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याच्या अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशात एक धक्कादायक बातमी नागपुरातून समोर आली आहे. ७ अल्पवयीन मुलांनी मिळून एका अल्पवयीनाचा खून केला आहे. या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे.
सक्षम तिनकर असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. नागपूर जिल्ह्यातील डोंगरगाव भागात ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांमध्ये अंतर्गत वाद होता, समझोता करण्यासाठी एकत्र जमले आणि हा खून केला.
हा प्रकार हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव भागातील असून आरोपी सौरभ उर्फ बादशाह आणि त्याच्या सात अल्पवयीन साथीदारांनी मिळून ही हत्या केली आहे. या मुलांमध्ये अनेक दिवसांपासून जुना वाद सुरू होता. त्याने सक्षमला आपण समझौता करू असे सांगून अज्ञात ठिकाणी बोलावले. नंतर वाद वाढला आणि मुलांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत सक्षम यांचा मृत्यू झाला आहे.
COMMENTS