तपासण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५२ टक्के विद्यार्थ्यांना तंबाखूचे व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
नागपूर विभागातील आठवी आणि नववीत शिकणाऱ्या ३ हजार ४८७ विद्यार्थ्यांना तोंडाच्या कर्करोगाने ग्रासले आहे. नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयाने केलेल्या मुख तपासणीत हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. या अहवालामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
नागपूर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची मुख तपासणी केली. इयत्ता आठवी आणि नववीच्या एकूण २३ हजार ८० विद्यार्थ्यांची मुख तपासणी करण्यात आली. यापैकी ३ हजार ४८७ विद्यार्थ्यांना तोंडाच्या कॅन्सरची असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
तपासणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी १५ टक्के तोंडाच्या कर्करोगाच्या मार्गावर आहेत. तपासण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५२ टक्के विद्यार्थ्यांना तंबाखूचे व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण आहे.
नागपूर दंत महाविद्यालयाने नागपूर, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा येथील विद्यार्थ्यांची मुख दंत तपासणी केली. अशा स्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, अशी चिंता नागपूर शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राज गजभीये यावर चिंता यांनी व्यक्त केली. याबाबत जनजागृती करून तंबाखू व खर्रा सेवनापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
COMMENTS