पाच दिवसीय कार्यक्रमाची उत्साहात सांगता | प्राणप्रतिष्ठापना, कलश रोहन, महायज्ञ सोहळा संपन्न अहमदनगर / नगर सह्याद्री स्वामी शिवानंद दादाजी ...
पाच दिवसीय कार्यक्रमाची उत्साहात सांगता | प्राणप्रतिष्ठापना, कलश रोहन, महायज्ञ सोहळा संपन्न
अहमदनगर / नगर सह्याद्री
स्वामी शिवानंद दादाजी दरबार श्री क्षेत्र खंडाळा येथे सोमवारी सायंकाळी स्वामी शिवानंद दादाजी व धुनी द्वारिका मैया यांची भव्य रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी दादाजींच्या जयघोषाने अवघी खंडाळा नगरी दुमदुमली. रथयात्रेमध्ये सुमारे तीन हजार भाविकांनी सहभाग नोंदवत रथयात्रेचा आनंद घेतला.
आद्य परम सद्गुरु स्वामी शिवानंद दादाजी व आद्य जगत जननी जगत माता धुनी द्वारिका मैया यांच्या आशीर्वादाने श्री. श्री. १००८ महान धुनिवाले धनंजय सरकार व परमपूज्य माऊली माताजी श्री. क्षेत्र पिंपळनेर (परमधाम) ता. साक्री जि. धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र खंडाळा ता. नगर येथील नूतन श्री. ओम शिवानंद दादाजी दरबार मध्ये दिनांक १० ते १४ ऑगस्ट दरम्यान ५ दिवस प्राणप्रतिष्ठापना, कलश रोहन, रथयात्रा सोहळा, महायज्ञ व प्रकट दिन सोहळा अशा विविध कार्यक्रमाची सांगता उत्साहात झाली असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिली.
१० ऑगस्टला कलश रोहन व प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाला. १३ ऑगस्ट रोटी यश प्राप्ती हवन हजारो दादाजी भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. १४ ऑगस्टला भव्य रथयात्रा काढण्यात आली. तसेच दररोज आरती, अभिषेक, ध्यानधारणा, ज्ञानदान झाले. सांस्कृतिक कार्यक्रम व प.पू. शरण्या प्रकट दिन होऊन महाप्रसादाने ५ दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली आहे.
पाच दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन आयोजन आद्य स्वामी शिवानंद दादाजी दरबार श्री क्षेत्र खंडाळा यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, विश्वात्मक ओम शिवानंद दादाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी भोर, सचिव जालिंदर दांगडे, उपाध्यक्ष कृष्णांत शिंदे, खजिनदार बबनराव खेडकर, नंदकिशोर उबाळे, बाळासाहेब मुळे, दौलत कार्ले, सुनील यादव, विकास चोभे, अनिल कोठुळे, मोहन कांबळे, बाळासाहेब लोटके, रघुनाथ चोभे, तुषार वामन, भारत साळवे मामा, मनोज जाधव, राजू पोटघन, ओंकार मुळे, दीपक कांबळे, रोहित बनसोडे, अनिल लोटके, अनिल दळवी, दिलीप कांबळे, प्रमोद लोटके व भक्त परिवार आदींनी केले.
COMMENTS