रविवारी यशप्राप्ती हवन, सोमवारी भव्य रथयात्रा अहमदनगर / नगर सह्याद्री - स्वामी शिवानंद दादाजी दरबार श्री क्षेत्र खंडाळा येथे स्वामी शिवानंद ...
रविवारी यशप्राप्ती हवन, सोमवारी भव्य रथयात्रा
अहमदनगर / नगर सह्याद्री -
स्वामी शिवानंद दादाजी दरबार श्री क्षेत्र खंडाळा येथे स्वामी शिवानंद दादाजी, माता धुनी द्वारिका मैय्या, धुनीवाले धनंजय सरकार, माऊली माताजी यांच्या प्रमुख उपस्थिती नुतन दादाजी दरबार येथे प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात झाला. यावेळी दादाजी भक्तांनी दादाजींच्या नामाचा जयघोष केला.
स्वामी शिवानंद दादाजी व माता धुनी द्वारिका मैय्या यांच्या कृपाशिर्वादाने धुनीवाले धनंजय सरकार व परमपुज्य माऊली माताजी श्री क्षेत्र पिंपळनेर (परमधाम, ता. साक्री, जि. धुळे) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र खंडाळा येथे भव्य नुतन दादाजी दरबार उभारण्यात आला आहे. ब्राह्मणांनी विधीवत पूजन व मंत्रोच्चारात स्वामी शिवानंद दादाजी, माता धुनी द्वारिका मैय्या यांनी प्रतिमा व कलश पूजन केल्यानंतर भाविकांच्या दादाजी नामाच्या जयघोषात प्राणपतिष्ठा व कलशारोहण सोहळा झाला. यावेळी संदेश कार्ले, सौ. सीमा संदेश कार्ले यांच्यासह २१ जोडप्यांनी हवन विधीवत हवन केले. संध्याकाळी हवन करण्यात आले. तसेच स्वामी शिवानंद दादाजींनी ज्ञानदान केले.
रविवारी यशप्राप्ती हवन होणार असून सोमवारी भव्य रथ यात्रेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यासह देशभरातून दादाजी भक्त उपस्थित राहत आहेत. भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आद्य स्वामी शिवानंद दादाजी दरबार, श्रीक्षेत्र खंडाळा यांच्या वतीने उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले, विश्वात्मक शिवानंद दादाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी भोर, सचिव जालिंदर दांगडे, उपाध्यक्ष कृष्णांत शिंदे, खजिनदार बबनराव खेडकर, नंदकिशोर उबाळे, सुनील यादव, बाळासाहेब मुळे, दौलत कार्ले, विकास चोभे, अनिल कोठुळे, मोहन कांबळे, बाळासाहेब लोटके, रघुनाथ चोभे, तुषार वामन, भारत साळवे, मनोज जाधव, राजू पोटघन, ओंकार मुळे, दीपक कांबळे, रोहित बनसोडे, अनिल लोटके, अनिल दळवी, दिलीप कांबळे, प्रमोद लोटके यांच्यासह दादाजी परिवारातील गुरुबंधूंनी केले आहे.
COMMENTS