बायोटेक्नॉलॉजी स्टॉक असून प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड असे या शेअरचे नाव आहे. याची किंमत 74.9 रुपयांवरून 485.75 रुपये झाली आहे.
Multibagger Stock 2023 : सध्या तरुणांचा शेअर मार्केटकडे मोठा ओढा आहे. अनेक शेअर्स असे आहेत की ते मल्टीबॅगर झाले आहेत. आज आपण अशा एका स्टॉकबद्दल माहिती घेऊयात की ज्याने शेअर्सधारकांना लाखोंचा फायदा मिळवून दिला आहे. (Praj Industries Limited )
बायोटेक्नॉलॉजी स्टॉक असून प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड असे या शेअरचे नाव आहे. याची किंमत 74.9 रुपयांवरून 485.75 रुपये झाली आहे. 28 ऑगस्ट 2020 रोजी या कंपनीचा शेअर 74.9 रुपयांच्या पातळीवर होता. या शेअर्सने गेल्या 3 वर्षात गुंतवणूकदारांना 535% परतावा दिला आहे.
एका महिन्यात शेअर 57.95 रुपयांनी वाढला
मंगळवारी कंपनीचा शेअर 1.93 टक्क्यांच्या वाढीसह 485.75 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 13.55 टक्क्यांनी म्हणजेच 57.95 रुपयांपर्यंत वाढला आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची विक्रमी पातळी 514.00 रुपये आहे आणि निम्न पातळी 298.65 रुपये आहे.
कंपनीचा निव्वळ नफा किती होता?
जून 2023 च्या तिमाहीत कंपनीने 58.7 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, तर मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 41.3 कोटी रुपयांचा नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल वाढून रु. 748.8 कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत रु. 735.4 कोटी होता. ऑपरेटिंग प्रोफाइल पहिल्या तिमाहीत वाढून रु. 75.5 कोटी झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत रु. 55.9 कोटी होता.
कंपनीचा व्यवसाय काय आहे?
प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड ही बायोटेक्नॉलॉजी कंपनी आहे. कंपनीच्या बिझनेस लाइन्समध्ये बायोएनर्जी, प्राज हाय प्युरिटी सिस्टीम्स (PHS), क्रिटिकल प्रोसेस इक्विपमेंट अँड स्किड्स (CPES), सांडपाणी प्रक्रिया आणि मद्यनिर्मिती आणि पेये यांचा समावेश आहे.
(डिस्क्लेमर : येथे फक्त शेअर्सच्या परफॉर्मेंस बद्दल माहिती दिली आहे, तो गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सल्लागाराचा सल्ला घ्या.)
COMMENTS