त्यांच्या उपस्थितीत आज दसरा चौकात पक्षाची निर्धार सभा होणार आहे. दुपारी ४ वाजता बैठक सुरू होईल.
मुंबई / नगर सह्याद्री -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज दसरा चौकात पक्षाची निर्धार सभा होणार आहे. दुपारी ४ वाजता बैठक सुरू होईल. वयाची ८० ओलांडूनही शरद पवार महाराष्ट्रभर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळे आजच्या सभेत उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापुरात पवारांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. दसरा चौकात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. यासोबतच शहरात अनेक ठिकाणी पोस्टबाजी करण्यात आलीये. पोस्टरवरून अजित पवार गटाला निशाणा साधला आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
कोल्हापूरात करण्यात आलेली बॅनरबाजी देखील लक्षवेधी आहे. यामध्ये 'बाप बापच असतो', 'महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास फर्मानासमोर गुडघे टेकणाऱ्या खंडोजी खोपड्यांचा नाही, तर वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजींचा आदर्श सांगतो.' यासह 'महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी योध्दा पुन्हा मैदानात' असा मजकूर लिहिलेले बॅनर कोल्हापूरातील दसरा चौकात लावण्यात आलेत.
COMMENTS