उपमहापौर गणेश भोसले | मोफत दंतरोग तपासणी शिबीरास मोठा प्रतिसाद अहमदनगर | नगर सह्याद्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये वर्षातून दोन वेळा शिबिरांप्रस...
उपमहापौर गणेश भोसले | मोफत दंतरोग तपासणी शिबीरास मोठा प्रतिसाद
अहमदनगर | नगर सह्याद्री
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये वर्षातून दोन वेळा शिबिरांप्रसंगी येत असतो. अतिशय अल्प दरात याठिकाणी उपचार सुविधा मिळतात. रूग्णांसाठी हॉस्पिटल मोठे वरदान ठरले आहे. करोना काळातही हॉस्पिटलने रूग्णांना मोठा दिलासा दिला आहे. याठिकाणी सर्व ट्रस्टी, डॉटर, स्टाफ अतिशय सेवाभावाने काम करणारा आहे. हॉस्पिटल परिसरातील महत्वाचा रस्ता लवकरच चांगल्या दर्जाचा होणार आहे. आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून लवकरच महापालिकेचे अद्ययावत हॉस्पिटल सुरु होत आहे. त्याठिकाणीही आनंदऋषीजी हॉस्पिटलने सहकार्य करावे, असे आवाहन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांच्या १२३ व्या जन्मदिनानिमित्त व स्व.कमलाबाई गुगळे, स्व.सुवालालजी गुगळे (एस.बी.जी.) यांच्या स्मरणार्थ गुगळे परिवारातर्फे जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे मोफत दंतरोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन अभयकुमार व अजितकुमार गुगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, निलेश इंगळे, उद्योजक अभिजीत गांधी, श्रुती गांधी, सी.ए.सोहन गुगळे, सौ.साधना गुगळे, सौ.कल्पना गुगळे, सारिका गुगळे, हर्षल गुगळे, श्रध्दा गुगळे, लक्ष्मी गुगळे, दंतरोग तज्ज्ञ डॉ.अर्पणा पवार, डॉ.प्राची गांधी, डॉ.प्रणव डुंगरवाल, डॉ.तृप्ती डुंगरवाल, डॉ.कोमल ठाणगे, डॉ.वसंत कटारिया, माणकचंद कटारिया, प्रकाश छल्लानी, डॉ.आशिष भंडारी, वसंत चोपडा आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रुती गुगळे म्हणाल्या की, योग्य वेळी,योग्य व्यक्तीला, योग्य कार्यासाठी जर दान दिले तर ते सात्विक दान मानले जाते. सध्या आचार्यश्रींचा जन्मदिन आहे, जैन सोशल फेडरेशनसारखे सत्कार्य करणारी संस्था आहे आणि रूग्णसेवेसारखे कार्य नाही. त्यामुळे हॉस्पिटलच्या या कार्यात हातभार लावता आला हे आमच्यासाठी भाग्यकारक आहे. आचार्यश्रींच्या कृपाशिर्वाद पूज्य आदर्शऋषीजी म.सा. यांच्या प्रेरणेमुळेच आम्हाला या सेवेची संधी मिळाली आहे व हॉस्पिटलच्या भविष्यातील कार्यायासाठी असेच सहकार्य करण्याचा प्रयत्न राहिल.
प्रास्ताविक डॉ.वसंत कटारिया यांनी केले. प्रा.माणिक विधाते म्हणाले, अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांबरोबरच आताच्या काळात वैद्यकीय उपचार ही सुध्दा गरज बनली आहे. ही गरज सेवाभावी वृत्तीने पूर्ण करण्याचे मोठे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल नगर शहरात करीत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या हॉस्पिटलच्या कार्याची दखल घेऊन कौतुक केले. आता नगरलाच होणार्या मनपाच्या हॉस्पिटलचे व्यवस्थापनही आनंदऋषीजी हॉस्पिटलने पहावे अशीच अपेक्षा आहे.
अभिजीत खोसे म्हणाले, आताच्या काळात वैद्यकीय उपचार खूपच महागले आहे. उपचार खर्च सर्वसामान्यांना परवडत नाही. अनेकवेळा कर्ज काढण्याची, घर दार विकण्याची वेळ येते. अशावेळी आनंदऋषीजी हॉस्पिटलमधील उपचार सेवा, येथे नियमित होणारी शिबिरे सर्वसामान्य रूग्णांसाठी पर्वणी असते. नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. डॉ.अर्पणा पवार यांनी दातांच्या आरोग्या बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आशिष भंडारी यांनी केले तर आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले. या शिबिरात १२२ रूग्णांची मोफत दंतरोग तपासणी करण्यात आली.
COMMENTS