रस्त्यामध्ये महिला अडवून रिलेशनशिपमध्ये तू माझ्याशी का बोलत नाहीस, रिलेशनशिपमध्ये तसेच जवळ का राहत नाहीस, असे म्हणून शिविगाळ केली.
अमरावती । नगर सह्याद्री
इस्टाग्रामवर व्हिडिओ टाकुन साऱ्या जगाला दाखविते, मला पण दाखव, अशी धमकी देत एका महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी ऋषभ जाधव (रा. अमरावती) याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुपारी दोनच्या दरम्यान आरोपीने त्या महिलेला फोन कॉल केला. तिने तो कॉल रिसिव्ह केला असता, आरोपीने तिला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करत महिलेला मारण्याची धमकी दिली. आरोपी एवढ्यावर न थांबता त्याने तिला ती इन्स्टावर टाकत असलेल्या व्हिडीओबाबत म्हटले की, साऱ्या जगाला व्हिडिओ दाखवतेस, मला पण दाखव, असे म्हणत त्याने तिला बलात्काराची धमकी दिली.
रस्त्यामध्ये महिला अडवून रिलेशनशिपमध्ये तू माझ्याशी का बोलत नाहीस, रिलेशनशिपमध्ये तसेच जवळ का राहत नाहीस, असे म्हणून शिविगाळ केली. व महिलेला मारण्याची धमकी देण्यात आली. महिला घाबरलेल्या अवस्थेत घरी आली. घडलेली घटना कुटुंबियांना सांगितल्यानंतर फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.
COMMENTS