पत्रकार परिषदेमध्ये अदिलने राखीवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राखीने देखील पत्रकार परिषद भरवत आदिलच्या सर्व आरोपावर प्रत्युत्तर दिले होते.
मुंबई । नगर सह्याद्री
राखी सांवत ही गेल्या काही दिवासांपासून सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी याला जेलमधून काही दिवसांपूर्वी सुटका मिळाली. सहा महिन्यांनंतर जेलमधुन बाहेर आल्यानंतर आदिलने पत्रकार परिषद भरवली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये अदिलने राखीवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राखीने देखील पत्रकार परिषद भरवत आदिलच्या सर्व आरोपावर प्रत्युत्तर दिले होते.
सध्या तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यातच आता आदिलने राखीवर आरोप करत त्याच्याकडे पुरावे असल्याचे सांगितले जात आहे. तेव्हा पासून राखीच्या अडचणी वाढणार असल्याचं म्हटले जात आहे. परंतु आता राखीची जिवलग मैत्रीण राजश्री ही देखील आता राखीच्या विरोधात गेली आहे. राजश्रीने राखी सावंत विरोधात पोलिसांत फिर्याद दाखल करत म्हटले आहे की, जेव्हापासून आदिलने मीडियासमोर राखीविरोधात वक्तव्य केले आहे.तेव्हापासून राखी त्याला धमक्या देत असते. याशिवाय राजश्री लवकरच मीडियासमोर सर्व काही उघड करणार असल्याचे म्हटले आहे.
राजश्रीच्या पोलिस तक्रारीनंतर राखी सावंतने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. राखीने विरल भयानीच्या पोस्टवर प्रतिक्रिया कमेंटमध्ये म्हटले आहे की, माझ्या वाईट काळात तू नेहमीच माझ्यासोबत होतीस आणि तुझ्या वाईट काळात मी नेहमीच तुझ्यासोबत होती. तू नेहमीच माझी चांगली मैत्रीण असशील. मला धक्का बसला आहे. माझ्या आयुष्यात काय चाललं आहे हे मला समजत नाही. शाब्बास आदिल, तू पुन्हा माझा मित्रांचा वापर केला आहे. मी प्रत्येक गोष्टीविरुद्ध लढेन. माझ्यासोबत देव आहे.
COMMENTS