केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क ४० टक्क्यांनी वाढवले आहे. याच्या निषेधार्थ आज राहुरी बाजार समितीने लिलाव बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
अहमदनगर / नगर सह्याद्री -
२४१० रुपये भावाने कांद्याची खरेदी म्हणजे सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क ४० टक्क्यांनी वाढवले आहे. याच्या निषेधार्थ आज राहुरी बाजार समितीने लिलाव बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी आणि श्रीरामपूर बाजार समित्यांमध्ये आज कांदा लिलाव बंद ठेवून व्यापाऱ्यांनीही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात निदर्शने सुरू असून केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत.
केंद्र सरकार महाराष्ट्रातून २४१० रुपये दराने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असून नाशिक आणि अहमदनगरमध्ये विशेष खरेदी केंद्रे सुरू उभारणार येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मात्र हा निर्णय शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आहे, असा आरोप शेतकरी आणि स्वाभिमानी किसान संघाने केला आहे. कांद्याला ४००-५०० रुपये भाव मिळत असताना सरकार झोपले होते का? असा सवालही शेतकऱ्यांनी केला आहे.
COMMENTS