आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त मणिपूर व मध्य प्रदेशातील घटनेच्या विरोधात नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
मुंबई / नगर सह्याद्री -
आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त मणिपूर व मध्य प्रदेशातील घटनेच्या विरोधात नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मणिपूर घटनेतील दोषींना तात्काळ फाशी द्या; या मागणीसाठी आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आदिवासी महिलाही पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाल्या होत्या. हाताला काळी पट्टी बांधून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
आक्रोश मोर्चात जिल्ह्यातील आदिवासी महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यासोबतच ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी यांच्यासह राजकीय नेत्यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि इतर संघटनांनी सहभाग नोंदवला.
COMMENTS