नगर सह्याद्री टीम : Prajakta Mali Latest News :छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनय व मनमोहक अदांमु...
Prajakta Mali Latest News :छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनय व मनमोहक अदांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचा फॅन फॉलोअर्स देखील खूप मोठा आहे.
तिच्या लग्नाविषयी अन तिच्या प्रेमाविषयी अनेकदा चर्चा होताना दिसतात. आता ती प्रेमाविषयीच्या एका पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवरून तिच्या आयुष्यात प्रेम आलं की काय असा सवाल अनेकांना पडला आहे. जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रकरण.
प्राजक्ता माळीने सदर पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्तानं गुलाबी रंगाचं टॉप परिधान केलं आहे. त्यासोबत प्राजक्ताच्या हातात एक पाटी आहे. त्या पाटीवर लिहिलं आहे की 'रेवा, वय - 25, उंची- 5.1, आरोप- प्रेमात पडणे'.
त्यात खाली त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की 'दुनिया गेली तेल लावत...' ही पोस्ट शेअर करत प्राजक्तानं 'मी रेवा! प्रेमात पडले आणि कळलंच नाही की इतकी कशी अडकले. कुणाच्या? इश्श! कळेलच तुम्हाला 29 सप्टेंबरला. #तीनअडकूनसीताराम फक्त चित्रपटगृहात.' असं कॅप्शन देखील प्राजक्तानं दिलं आहे.
खरंतर प्राजक्ताची ही पोस्ट तिच्या आगामी चित्रपटासाठी आहे. तिचा आता सिनेमा येत आहे. या चित्रपटाचे नाव 'तीन अडकून सीताराम' असे आहे. या सिनेमाच्या अनुशंघाने तिने हे पोस्ट केले आहे.परंतु या पोस्टमुळे नेटकरी मात्र चांगलेच सुखावले आहेत. त्यांनी विविध कमेंट याठिकाणी केल्या आहेत.
COMMENTS