कार्याशी जोडला गेलेला आहे याचा कायम अभिमान वाटतो, असे प्रतिपादन अहमदनगर मर्चंटस् को.ऑप.बँकेचे संचालक संजय चोपडा यांनी केले.
मोफत आरोग्य शिबिरांची सांगता, ५१५१ रूग्णांची तपासणी, सवलतीत शस्त्रक्रिया
अहमदनगर | नगर सह्याद्री
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांनी सामान्यांसाठी उच्च दर्जाच्या आरोग्य सेवेचे स्वप्न पाहिले होते. जैन सोशल फेडरेशनने आनंदऋषीजी हॉस्पिटलची उभारणी करून ते स्वप्न साकार केले आहे. याठिकाणी गोरगरीब रूग्णांना दर्जेदार सेवा दिली जाते तसेच येथे आचार्यश्रींचे आशीर्वाद आणि उत्तम वैद्यकीय सुविधा याचा अनोखा संगम आहे. त्यामुळे येथे येणार्या रूग्णाला १०० टक्के बरे होण्याचा विश्वास असतो. हॉस्पिटलच्या प्रारंभापासून या कार्याशी जोडला गेलेला आहे याचा कायम अभिमान वाटतो, असे प्रतिपादन अहमदनगर मर्चंटस् को.ऑप.बँकेचे संचालक संजय चोपडा यांनी केले.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांच्या १२३ व्या जन्मजयंतीनिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोजित विविध आरोग्य शिबिरांची सांगता दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रिया (बिनटाका) शिबिराने झाली. या शिबिरासाठी स्व.पोपटलालजी, मुलतानचंदजी लुणिया यांच्या स्मरणार्थ राजकुमार, निखिल, स्वप्निल लुणिया, वर्षा उद्योग समूह (नगर) प्रायोजक होते. शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी अहमदनगर मर्चंटस् बँकेचे व्हा.चेअरमन अमित मुथा, ज्येष्ठ संचालक अनिल पोखरणा, आनंदराम मुनोत, संजय चोपडा, संजय बोरा, कमलेश भंडारी, किशोर मुनोत, सुभाष बायड, मिनाताई मुनोत, विजय कोथिंबीरे, कर्मचारी प्रतिनिधी प्रसाद गांधी, जॉइंट सीईओ नितीन भंडारी, राहाता येथील डॉ.अशोक लोढा, उद्योजक प्रेमराज बोथरा, राजकुमार लुणिया, निखिल लुणिया, स्वप्निल लुणिया, अंजलीताई लुणिया, मंगलताई लुणिया, संतोष बोथरा, सतीश लोढा, डॉ.वसंत कटारिया, डॉ.प्रकाश कांकरिया, माणकचंद कटारिया, प्रकाश छल्लानी, डॉ.आशिष भंडारी, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, तज्ज्ञ डॉ.भास्कर पालवे, डॉ.रवींद्र मुथा, डॉ.सोनल बोरुडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी केले. किशोर मुनोत म्हणाले की, जवळपास पाव शतकापासून आनंदऋषीजी हॉस्पिटल अविरत सेवा देत आहे. आरोग्य सेवेचा महायज्ञ याठिकाणी सुरु आहे. तो कायम चालू राहिल असा विश्वास आहे. या कार्यास मुनोत-नेवासकर ट्रस्टचे नेहमीच सहकार्य राहणार आहे. हॉस्पिटलचा विस्तार होत असून या माध्यमातून जास्तीत जास्त रूग्णांना सेवा मिळणार आहे. जैन सोशल फेडरेशन आरोग्य क्षेत्राबरोबरच आता शैक्षणिक क्षेत्रातही पदार्पण करीत असून हे कार्य कौतुकास्पद आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आशिष भंडारी यांनी केले, आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले.
COMMENTS