पंकजा मुंडे २०२४ मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार, असे मोठे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा प्रदेश सचिवांनी केले आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा मराठवाडा दौरा सुरू झाला आहे. आज त्यांची बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात ही सभा होणार असून धनंजय मुंडे यांच्यासाठी शरद पवार कोणता पर्याय शोधतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा स्थितीत पंकजा मुंडे २०२४ मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार, असे मोठे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा प्रदेश सचिवांनी केले आहे.
अजित पवार सत्तेवर आल्यावर धनंजय मुंडेही त्यांच्यात सामील झाले. यावेळी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देण्यात आले. त्याचवेळी पंकजा मुंडे यांना अजूनही राज्य सरकारमध्ये स्थान मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा सातत्याने ऐकायला मिळतात. आता पंकजा मुंडे राष्ट्रवादीकडून थेट निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
"भाजपने राज्यात पक्ष फोडायचे काम केले आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काय केले हे माहित आहे. त्यानंतर त्यांच्या मुलींना देखील त्रास दिला जातोय. त्यामुळे पंकजा मुंडे २०२४ला राष्ट्रवादीकडून निवडणूक लढतील?", असे मोथे विधान राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव केके वडमारे यांनी केले आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची तोफ बीडमध्ये धडाडणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची राज्यातील दुसरी आणि मराठवाड्यातील पहिली सभा आज बीडमध्ये होत आहे. आज पवार यांचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते भव्य रॅलीने स्वागत करण्यात येणार आहे.
COMMENTS