महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार' दिला जातो. पद्मविभूषण रतन टाटा हे या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले.
मुंबई / नगर सह्याद्री -
महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रातील नामवंत उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारतर्फे 'महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार' दिला जातो. पद्मविभूषण रतन टाटा हे या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह रतन टाटा यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. रतन टाटा यांना 'महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर राज्य सरकारने उद्योग क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना 'महाराष्ट्र उद्योग पुरस्कार' देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या या पुस्कारसोहळ्याचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. इतर उद्योजकांनाही पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
उद्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना तर उद्या उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना देण्यात येणार आहे. विलास शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता वांद्रे -कुर्ला संकुलमधील जियो वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील जास्मिन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी असणाऱ्या या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस हे प्रमुख अतिथी असतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
COMMENTS