Oppo A38 : अनेकांना कमी किमतीत स्मार्टफोन हवा असतो. आता या लोकांसाठी खुशखबर आहे. OPPO सध्या बाजारात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे.
नगर सह्याद्री टीम :
Oppo A38 : सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे. स्मार्टफोन ची एक क्रेझ आहे. दरम्यान अनेकांना कमी किमतीत स्मार्टफोन हवा असतो. आता या लोकांसाठी खुशखबर आहे. OPPO सध्या बाजारात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे.
ही कंपनी सध्या आपल्या कमी किमतीच्या स्मार्टफोनवर काम करत आहे, Oppo A38 असे या नवीन मॉडेलचे नाव आहे. याची किंमत अगदीच कमी असणार असून कंपनी हा फोन जागतिक बाजारात लॉन्च करण्याचा विचार करत आहे. हे TDRA, SIRIM, NBTC आणि GCF द्वारा सर्टिफाइड केले आहे. Appuals च्या नवीन अहवालात Oppo A38 चे रेंडर, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत उघड झाली आहे. Oppo A38 बद्दल सविस्तर जाणून घेऊया...
Oppo A38 चे स्पेसिफिकेशन्स
Oppo A38 मध्ये 6.56-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1612×720 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 16.7 मिलियन कलर्स सपोर्टसह HD + व्हिज्युअल प्रदान करतो. या फोनला MediaTek Helio G80 प्रोसेसर आहे, 4GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. हे डिव्हाईस Oppo च्या ColorOS 13 स्किनसह सानुकूलित Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर चालते, या द्वारे तुम्हाला लेटेस्ट फीचर्सचा आनंद घेता येईल.
Oppo A38 कॅमेरा
Oppo A38 मध्ये 50MP प्राइमरी रिअर कॅमेरा आहे, तसेच 2MP सेकेंडरी रियर कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, यात 5MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. हे डिवाइस दिवसभर चालू ठेवण्यासाठी 5000mAh बॅटरी पुरेशी आहे आणि चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी ते USB-C पोर्ट यात येते.
Oppo A38 ची किंमत
OPPO A38 च्या 4GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची युरोपियन मार्केट किंमत EUR 159 (सुमारे 14 हजार रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक व गोल्ड या दोन रंगात येतो. युरोपमध्ये लॉन्च केल्यानंतर भारतासह अनेक आशियाई देशांमध्ये लॉन्च केले जाऊ शकते.
COMMENTS