घटनास्थळावरील नागरिकांनी तातडीने धाव घेऊन खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जालना । नगर सह्याद्री
पैशांच्या देवाण-घेवाणीवरून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या कानावर पिस्तूल धरून चाकूने पोटावर वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना जालना शहरातील मंठा बायपासजवळ रविवारी सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान घडली. याप्रकरणी व्यापारी वीरेंद्र धोका हे गंभीर जखमी झाले असून जालना येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
वीरेंद्र धोका यांचा एका व्यक्तीसोबत पैशांच्या देवाण-घेवाणी वादावादी सुरु होती. त्यानंतर समोरील व्यक्तीने वीरेंद्र यांच्यावर पिस्तूल काडून गोळीबार करणार तेवढयात वीरेंद्र बाजूला सरकले. त्यावेळी बंदुकीमधील चार गोळ्या या जमिनीवर पडल्या. आरोपीने नंतर चाकू काढून वीरेंद्र यांच्या पोटावर चेहऱ्यावर वार केले. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
घटनास्थळावरील नागरिकांनी तातडीने धाव घेऊन खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली. सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
COMMENTS