घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलीस व पिंजर पोलिसांनी जीवरक्षक दीपक सदाफळे व त्यांच्या टीमला रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यासाठी धरणावर पाठविले.
अकोला । नगर सह्याद्री
बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. घडलेली घटना बुधवारी घडली. उर्वरित दोन तरुण सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले परंतु एकाचा बुडून मृत्यू झाला.
खिजर अहमद, शब्बीर अहमद, सय्यद कौसेन, सय्यद सलीम, मोहम्मद दानिश, मोहम्मद अबिद हे तरुण काटेपूर्णा धरणात पोहण्यासाठी गेले होते. या तरुणाला पोहायला येत नसल्याने एकमेकांच्या खांद्यावर हात ठेऊन ते नदीपात्रात उतरले. थोडया अंतरावर चालत गेल्याने पाण्याच्या लाटा अंगावर आल्या. त्यानंतर तोल गेल्याने एकमेकांचे हात सुटले. यांमधील दोनजण काठावर फेकले गेल्याने ते बचावले परंतु खिजर अहेमद हा खोल पाण्यात ओढल्या गेल्याने बेपत्ता झाला.
तरुण घाबरले असल्याने त्यांनी याची कल्पना उशिरा दिली. घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलीस व पिंजर पोलिसांनी जीवरक्षक दीपक सदाफळे व त्यांच्या टीमला रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यासाठी धरणावर पाठविले. रात्री २:३० वाजताच्या दरम्यान बचाव पथकाला खोल पाण्यात खीजर अहमदचा मृतदेह सापडला.
COMMENTS