आयोजित पत्रकार विरोधी कायदा परिषदेत सहभागी झाले होते. बदलत्या पत्रकारितेबद्दल चिंता व्यक्त करत राज ठाकरे यांनी कार्यक्रमात भाजप सरकारवर टीका केली.
मुंबई / नगर सह्याद्री -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्डच्या वतीने आयोजित पत्रकार विरोधी कायदा परिषदेत सहभागी झाले होते. बदलत्या पत्रकारितेबद्दल चिंता व्यक्त करत राज ठाकरे यांनी कार्यक्रमात भाजप सरकारवर टीका केली.
या कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांवरील हल्ले आणि राजकीय दबावाबाबत चिंता व्यक्त केली. राज ठाकरे यावेळी म्हणाले की, पत्रकारांवर होणारे हल्ले निषेधार्ह आहेत. त्याबद्दल आम्हालाही राग आहे. महाराष्ट्रात पत्रकारिता अजूनही जिवंत आहे,
ट्रोलिंग करणाऱ्याला काही पडलेली नसते. तुम्ही कशाला वाटून घेता. त्यांना मागच्या पुढचा इतिहास माहीत नसतो. मुलाखत ऐकलेली नसते. बास फक्त व्यक्त व्हायचे राजकीय लोकांनी पाळलेली लोकं आहेतच. त्या पाळलेल्या लोकांवर कशाला प्रतिक्रिया देता? ते पाळलेले आहेत. त्यांना लिहायचे दर महिन्याला पैसे मिळतात. त्यांचा कसला विचार करता?" असे ते यावेळी म्हणाले.
प्रत्येकाचा एक काळ असतो. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही. ज्या दिवशी सत्ता हातात येते, त्याच दिवशी ती निघून जाते. आपण ते किती ठेवू इच्छिता हे आपल्यावर अवलंबून आहे. विरोधक कधीच जिंकत नाहीत. सत्ताधारी पराभूत होत असल्याचेही राज म्हणाले.
पुर्वी पत्रकारांसाठी लढणाऱ्या भाजप पक्षाच्या सत्तेच्या काळातच पत्रकारांवर बंधने लादली जात आहेत, ही चिंताजनक बाब असल्याचे म्हणत भाजपने त्यांचा इतिहास एकदा उलघडून पाहावा.. असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.
COMMENTS