मयूर याच्यावर हल्ला केलेल्या तरुणाला अवघ्या १२ तासामध्ये पोलिसांनी मोखाडा येथून अटक करण्यात आली आहे.
नाशिक । नगर सह्याद्री
अंबड शहरामध्ये काल दुपारच्या दरम्यान मयूर दातीर या युवकावर चॉपरीने पोटावर आणि छातीवर सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. मयूर याच्यावर हल्ला केलेल्या तरुणाला अवघ्या १२ तासामध्ये पोलिसांनी मोखाडा येथून अटक करण्यात आली आहे.
अंबड पोलीस ठाणे आणि नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या एकत्रित टीमने जव्हार -मोखाडा येथे या तरुणांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी करण अण्णा कडूसकर (21), मुकेश अनिल मगर (25), रवींद्र शांताराम अहेर (20) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
संतप्त झालेल्या अंबड येथील नागरिकांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करून अंबडगाव येथून अंबड पोलीस स्टेशन पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला होता. तसेच आरोपीला अटक होई पर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा देखील देण्यात आला.
COMMENTS