अनेक दिवसांपासून अहमदनगर शहरामध्ये डोळ्याच्या साथीचे आजार चालू असून लहान मुलापासून ते वयोवृध्दापर्यंत डोळे आल्याचे पाहावयास मिळत आहे.
आरोग्य अधिकार्यांनी डोळ्यांच्या साथीच्या आजारावर औषधे मोफत उपलब्ध असल्याची केलेली घोषणा हवेतच
अहमदनगर | नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाचा पर्दाफाश केला आहे.
महिन्याभरापासून शहरात नागरिकांना डोळे येण्याची साथ सुरु असून महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र अद्याप पर्यत कोणत्याही उपाययोजना न करता आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी वृत्तपत्रात बातमी देत सांगितले. मनपाच्या सर्व आरोग्य केंद्रावर डोळ्याचे औषध (आयड्रॉप) उपलब्ध आहे. त्यानुसार शहरातील नागरिक उपचारासाठी तेथे गेले असता त्या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसल्याचे निदर्शनास आले. आरोग्य कर्मचार्यांना विचारपूस केल्या नंतर गेल्या अनेक दिवसांपासून येथे औषध उपलब्ध नसल्याचे सांगितले जात होते ही माहिती महिला राष्ट्रवादी काँग्रेसला समजताच त्यांनी माळीवाडा येथील महात्मा फुले आरोग्य केंद्र तसेच भोसले आखाडा येथील जिजामाता आरोग्य केंद्र या ठिकाणी जावून पाहणी करत या प्रकाराचा पर्दाफाश केला.
महानगर पालिकेच्या कोणत्याच आरोग्य केंद्रामध्ये साथीच्या आजारावरील आयड्रॉप उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर शहरामध्ये डोळ्याच्या साथीचे आजार चालू असून लहान मुलापासून ते वयोवृध्दापर्यंत डोळे आल्याचे पाहावयास मिळत आहे. परंतु महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणत्याच पध्दतीची उपाययोजना करण्यात येत नाही. वर्तमान पत्रांमध्ये खोट्या बातम्या देऊन सर्व सामान्य नागरिकांची व सत्ताधार्यांची फसवणुक चालू असल्याचेच दिसून येत आहे. त्याचप्रमाणे या दोन ही आरोग्य केंद्रांमध्ये एक कुत्र चावलेला मुलगा आला होता, त्याला सुध्दा अॅन्टीरेबिज लस उपलब्ध नसल्याचे महापालिका आरोग्य केंद्राकडून सांगण्यात आले. त्यामुळे आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या औषधांचे ऑडीट करणे गरजेचे आहे. व नगरकरांची दिशाभूल करणार्या आरोग्य अधिकार्यावर तातडीने चौकशी बसवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिला राष्ट्रवादीच्या वतीने मनपाच्या आरोग्य विभागात आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, विधी विभागाचे प्रदेश प्रमुख अंजली आव्हाड, सुमित कुलकर्णी, गजू भांडवलकर, आनंद गारदे, किरण कटारिया, सुनंदा कांबळे, लता गायकवाड, मनिषा गर्जे, पप्पू पाटील, विशाल म्हस्के, निलेश घुले, रुपेश चोपडा आदी उपस्थित होते. दरम्यान आरोग्य अधिकारी यांनी यावेळी सांगितले की, मनपाच्या सर्व आरोग्य केंद्रावर डोळ्याचे औषध (आयड्रॉप) १५ मिनिटांत उपलब्ध करून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.
COMMENTS