Rain Update : राज्यात सध्या मान्सूनने पावसासाठी खूपच प्रतीक्षा करायला लावलीआहे. राज्यात बहुतांशी भागात समाधानकारक पाऊस नाही.
पुणे / नगरसह्याद्री
Rain Update : राज्यात सध्या मान्सूनने पावसासाठी खूपच प्रतीक्षा करायला लावलीआहे. राज्यात बहुतांशी भागात समाधानकारक पाऊस नाही. ऑगस्ट महिनादेखील कोरडाच गेला. थोडाफार सोडला तर मोठा पाऊस कुठेच नाही. आता पावसाबाबत चिंता वाढवणारी बातमी आली आहे.
पुणे हवामान विभागाने मान्सून संदर्भात मोठा अंदाज वर्तवला आहे. मान्सून आता हिमालयाच्या पायथ्यापर्यंत पोहोचला आहे. पश्चिमी वाऱ्याची गतीही कमी झाली आहे. यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. परंतु मुसळधार पाऊस कोठेही होणार नाही.
दोन दिवस कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. राज्यात कोणत्याही भागात पावसाचा यलो किंवा ऑरेंज अलर्ट दिलेला नाही. देशात पश्चिमी वाऱ्याची गती कमी झाल्यामुळे पावसाचा वेग मंदावला आहे, असे पुणे हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे.
त्यामुळे आता राज्यावर दुष्काळाचं गडद सावट सध्या दिसत आहे. खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, यावल अनेक तालुक्यांमध्ये दोन आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातही पावसाने दडी मारली आहे. सध्या शेतकऱ्यांसह सर्वच नागरिक पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. परंतु आता हवामान विभागाच्या या नव्या अंदाजाने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे.
COMMENTS