पुणे / नगर सह्याद्री Mansoon Latest News : प्रतिकूल वातावरणामुळे पावसाने दडी मारल्याने ३० ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रभर पावसाचे प्रमाण असमाधानक...
पुणे / नगर सह्याद्री
Mansoon Latest News : प्रतिकूल वातावरणामुळे पावसाने दडी मारल्याने ३० ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रभर पावसाचे प्रमाण असमाधानकारक आहे. सलग तिसऱ्या महिन्यात बहूतांष ठिकाणी मान्सून आपली सरासरी गाठू शकलेला नाही.
वातावरणात सध्या उष्णता वाढलेली दिसते. त्यामुळे बळीराजा सध्या पावसाकडे डोळे लावून बसलेला आहे. दरम्यान आता पावसाबाबत एक चांगली बातमी आली आहे. 'येत्या चार दिवसात मान्सून काही प्रमाणात सक्रीय होत आहे.
३ आणि ४ सप्टेंबरला राज्यात प्रामुख्याने विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यामध्ये समाधकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडणार असल्याने ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे,' असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केलाय.
COMMENTS