पंतप्रधान पीक विमा योजना आणि फळपीक विमा योजनेत नोंदणी संख्येवरून महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पुणे । नगर सह्याद्री
पंतप्रधान पीक विमा योजना आणि फळपीक विमा योजनेत नोंदणी संख्येवरून महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशामध्ये राजस्थान पहिल्या, तर मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमाकांवर आहे. कृषी विभागाचे प्रमुख सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी माहिती दिली. राज्यातून पंतप्रधान पीक विमा योजना आणि फळपीक विमा योजनेसाठी एकूण १,७१,२१,७६९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
पंतप्रधान पीक विम्यासाठीच्या अर्जांची संख्या १ कोटी ६९ लाख ४८ हजार ७९० इतकी आहे. इतर अर्ज फळपीक विमा योजनेसाठी भरण्यात आले आहेत. या सर्व अर्जांद्वारे १,१३,६७,६७१ हेक्टरवरील खरीप पिके आणि फळपिके सुरक्षित झाले आहेत. यंदा एक रुपयात पीक विमा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे विमा नोंदणीच्या संख्येत वाढ झाली आहे.
राज्यामधील कर्जदार शेतकऱ्यांकडून ६,९२,७१० अर्ज दाखल करण्यात आले आहेत. बिगरकर्जदार शेतकऱ्यांकडून १,६४,२९,०५९ अर्ज भरण्यात आले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत विमा अर्जांची संख्या १७५ टक्क्यांनी, तर संरक्षित क्षेत्रात १९५ टक्क्यांनी वाढली आहे. पहिल्या क्रमाकांवर असलेल्या राज्यस्थानमधून एकूण २ कोटी ९ लाख ९९ हजार ७२२ अर्ज तर तिसऱ्या क्रमांकावरील मध्य प्रदेशातून ८८ लाख ६१ हजार ५४६ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
COMMENTS