१८ ते २४ ऑगस्ट दरम्यान जोर धरणार मुंबई | नगर सह्याद्री - राज्यात काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभाग...
१८ ते २४ ऑगस्ट दरम्यान जोर धरणार
मुंबई | नगर सह्याद्री -
राज्यात काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी राज्यात पावसाची शयता आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशभरात पावसाचा जोर ओसरला आहे. भारतीय हवामान विभागातर्फे ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे पुन्हा पावसाचे आगमन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. राज्यात कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाचा, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलया पावसाचा अंदाज आहे.नांदेड, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांचा कडकडाटसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शयता वर्तवली आहे. पश्चिम, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा असेल. मराठवाड्यातही विविध भागांमध्ये पावसाची शयता आहे. या आठवड्यात राज्याच्या काही भागात जोरदार पावसाची शयता आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने काही काळ ओढ दिली होती. भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार १८ ते २४ ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा जोर धरेल.
COMMENTS