लंम्पी या गुरांमध्ये पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा दिसून आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलण्यात येत
मुंबई / नगर सह्याद्री -
लंम्पी या गुरांमध्ये पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा दिसून आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत. लंम्पीची लागण होत असल्याने गुरांना लसीकरण केले जात आहे.
लम्पी हा एक सांसर्गिक त्वचेचा रोग आहे ज्यामध्ये मोठ्या गाठी येणे,आणि जनावरांमध्ये तापासारखी लक्षणे आढळतात. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात या आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला असून पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना तीव्र करण्यात आल्या असून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात ३ लाख ४ हजार लसींचा मुबलक साठा उपलब्ध असून, संसर्गग्रस्त जनावरे आढळल्यास टोल फ्री क्रमांक १९६२ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रादुर्भाव वाढल्यास ज्या भागात या आजाराच्या जनावरांची संख्या अधिक असेल त्या भागात होणाऱ्या जनावरांच्या बाजार आणि पशु प्रदर्शनावर बंदी आणण्यात येईल. लंम्पी नियंत्रणासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाल्याची पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. यु. डी. पाटील यांनी माहिती दिली.
COMMENTS