स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून अमली पदार्थ जप्त केले.
मुंबई / नगर सह्याद्री -
जालना शहरातील बडी सडक परिसरात असलेल्या कोमल गिफ्ट गॅलरी सेंटरमधून मोठ्या प्रमाणात गांजासदृश पदार्थाची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून अमली पदार्थ जप्त केले.
जालना शहरातील बडी सडक परिसरात असलेल्या गिफ्ट गॅलरी सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून २५ ते ३५ किलो गांजा सदृश अमली पदार्थ जप्त केला. गेल्या काही दिवसांपासून या गिफ्ट गॅलरी सेंटरमधून मोठ्या प्रमाणात भांगेवर आधारित अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बडी सडक भागातील कोमल गिफ्ट गॅलरी सेंटरवर (एलसीबी) रात्री नऊच्या सुमारास छापा टाकून अमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करताना गिफ्ट गॅलरी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
शहरातील उच्चभू वस्ती समजल्या जाणाऱ्या बडी सडक परिसरात असलेल्या गिफ्ट गॅलरी सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा-अमली पदार्थ मिळाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यामागे मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.
COMMENTS