मिमी हा चित्रपट 2021 रोजी रिलीज झाला. कृतीनं या चित्रपटामध्ये मिमी राठोड ही भूमिका साकार केली होती.
मुंबई । नगर सह्याद्री
चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा 69 वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अभिनेत्री कृती सेननला जाहीर करण्यात आला. कृतीनं खास पोस्ट शेअर करुन तिचा आनंद व्यक्त केला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्यांनी माझ्या या पुरस्कारासाठी विचार केला त्या ज्युरींचे आभार! हे माझ्यासाठी संपूर्ण जगासारखं आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते.
माझ्या पाठीशी सदैव उभे राहण्यासाठी आणि मला चित्रपट दिल्यासाठी. पुढे पोस्टमध्ये म्हटले की लक्ष्मण सर.. तुम्ही मला नेहमी म्हणता मिमी, देखना आपको फिल्म के लिए राष्ट्रीय पुरस्कार मिलेगा मिल गया सर! मी तुमच्याशिवाय हे करू शकले नसते. आई, बाबा, नॅप्स.. तुम्ही लोक माझी लाईफलाइन आहात! धन्यवाद. माझ्यासाठी नेहमी चेअर लिडर होण्यासाठी धन्यवाद.
मी खूप उत्साहित आहे. कृतीच्या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. कृतीला मिमी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मिमी हा चित्रपट 2021 रोजी रिलीज झाला. कृतीनं या चित्रपटामध्ये मिमी राठोड ही भूमिका साकार केली होती.
या चित्रपटासाठी अभिनेते पंकज त्रिपाठी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. अभिनेत्री सई ताम्हणकरनं देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. कृतीचा आदिपुरुष हा चित्रपट काही दिवसांनपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कृतीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
COMMENTS