पत्रकाराला भरचौकात बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
पाचोरा तालुक्यातील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. यामध्ये पत्रकाराला मारहाण करण्याची धमकी देण्यात दिली. या धमकीनंतर आता या पत्रकाराला भरचौकात बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
पाचोरा येथे पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण झाल्याच्या घटनेवर आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ ट्विट करत त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
"पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची..का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून. विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली, त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे. ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी आले असेल.." असे संतप्त ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.
"आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना, स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का? हाच प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे, असो, सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा असते, पण जेव्हा एका पत्रकाराला अशी मारहाण झाली, तेव्हा महाराष्ट्रातील पत्रकार विरोध करण्याची हिंमतही दाखवत नाहीत, हे नक्कीच अनपेक्षित आहे.
COMMENTS