नगर सह्याद्री टीम Jio Air Fiber : जिओने इंटरनेट जगतात मोठी क्रांती केलीआहे. इंटरनेटच्या वापराची अन स्पीडची सवय जिओनेच लावली असे अनेकदा म्हटल...
नगर सह्याद्री टीम
Jio Air Fiber : जिओने इंटरनेट जगतात मोठी क्रांती केलीआहे. इंटरनेटच्या वापराची अन स्पीडची सवय जिओनेच लावली असे अनेकदा म्हटले जाते. दरम्यान आता जिओ पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार आहे. त्याचे कारण असे की jio चे बहुप्रतीक्षित Jio Air Fiber गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी लॉन्च केले जाणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा केली आहे. Jio Air Fiber 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घरे आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा देईल. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM मध्ये मुकेश अंबानी म्हणाले की, “आमच्या ऑप्टिकल फायबर सेवेशी, जिओ फायबरशी 1 कोटीहून अधिक परिसर जोडलेले आहेत.
तरीही लाखो कॅम्पस आहेत जेथे वायर कनेक्टिव्हिटी देणे कठीण आहे. जिओ एअर फायबर ही अडचण कमी करेल. याद्वारे आम्ही 20 कोटी घरे आणि परिसरांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करत आहोत. जिओ एअर फायबर सादर केल्यामुळे, जिओ दररोज 1.5 लाख नवीन ग्राहक जोडू शकेल.
वार्षिक सर्वसाधारण सभेने Jio Air Fiber तसेच Jio True 5G डेव्हलपर प्लॅटफॉर्म आणि Jio True 5G लॅब लॉन्च करण्याची घोषणा केली. लॉन्चची घोषणा करताना, जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले, “आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करत आहोत जे भारतीय उद्योग, छोटे व्यवसाय आणि तंत्रज्ञान स्टार्ट-अप्सच्या डिजिटल जगाशी संवाद साधण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणतील. दरम्यान आता jio च्या या नव्या घोषणेने ग्राहकांची प्रतीक्षा संपली आहे. इंटरनेट जगतात पुन्हा एकदा मोठी क्रांती याने होईल असे मत अनेक लोक व्यक्त करत आहेत.
COMMENTS