या आगीचे धुराचे लोट सर्वत्र पसरल्याने कचऱ्याचे वर्गीकरण करणारी विविध प्रकारची यंत्रणा देखील जळून खाक झाली आहे.
बारामती । नगर सह्याद्री
शहरातील अंबिकानगर लगतच्या बारामती नगरपालिकेच्या कचरा डेपोस गुरुवारी पहाटे दोनच्या दरम्यान आग लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आगीचे धुराचे लोट सर्वत्र पसरल्याने कचऱ्याचे वर्गीकरण करणारी विविध प्रकारची यंत्रणा देखील जळून खाक झाली आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी ही नवीन यंत्रणा बसविली होती.
या आगीमुळे जवळपास 80 लाख रुपयांचे नगरपालिकेने नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. त्या ठिकाणी दोन वॉचमन सातत्याने कार्यरत असतात व नगरपालिकेने सीसीटीव्ही यंत्रणादेखील बसवली आहे. परंतु तरीदेखील आगीचे अद्याप कारण समोर आले नाही. नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आगीच्या कारणांचा शोध घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच बारामती नगर परिषदेसह एमआयडीसी, छत्रपती सहकारी साखर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखाण्याच्या अग्निशामक दलाच्या वाहनांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीमध्ये बारामती नगरपालिका तसेच लुको कंपनीची कचरा वर्गीकरण करणारी जवळपास सात ते आठ यंत्रे जळून भस्मसात झाली आहेत.
COMMENTS