आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. बहुप्रतिक्षेत असणाऱ्या आरोग्य विभागात जवळपास 11 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झालीये.
अहमदनगर / नगर सह्याद्री
Arogya Vibhag Bharati 2023 : नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आली आहे. आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. बहुप्रतिक्षेत असणाऱ्या आरोग्य विभागात जवळपास 11 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झालीये.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कालपासून अर्थात 29 ऑगस्ट 2023 पासून सुरू झाली आहे. त्यामुळे लाखो इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. मागील तीन वर्षांपासून राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया रखडलेली होती. आरोग्य विभाग ग्रुप क आणि ग्रुप ड या दोन विविध जिल्ह्यांच्या जाहिराती काल मंगळवारी प्रसिद्ध झाल्या आहेत.
या भरती अंतर्गत गट ‘क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर गट ‘ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया काल 29 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वाजेपासून सुरु झाली आहे. 18 सप्टेंबर 2023 ही अंतिम तारीख असणार आहे.
अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत. तसेच सदर भरती प्रक्रिया कधी सुरु होते याकडे सर्वांचेच लक्ष होते. मागील काही दिवसांपासून ही प्रक्रिया रखडलेली होती. आता ही भरती प्रक्रिया सुरु झाली असल्याने अनेकांना नोकरीची संधी मिळणार आहे.
COMMENTS