पनवेल शहरतुन एक धक्कदायक प्रकार घडला होता. ३०० रुपयांवरुन हत्या करुन पळून गेलेल्या आरोपी सचिन शिंदे याला पनवेल शहर पोलिसांनी संभाजीनगर येथून अटक केली
मुंबई / नगर सह्याद्री -
पनवेल शहरतुन एक धक्कदायक प्रकार घडला होता. ३०० रुपयांवरुन हत्या करुन पळून गेलेल्या आरोपी सचिन शिंदे याला पनवेल शहर पोलिसांनी संभाजीनगर येथून अटक केली आहे. हत्याकांडमुळे पनवेलसह नवी मुंबईत एकच खळबळ उडाली हाेती.
काही दिवसांपूर्वी पनवेल रेल्वे स्थानक परिसरात विकी चिंडालिया नावाच्या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पनवेल शहर पोलिसांची पथके ठिकठिकाणी पाठविण्यात आले हाेते.
तपासअंती संशयित हा संभाजीनगर येथे असल्याची गुप्त माहिती पाेलिसांना मिळाली. पाेलिसांनी विकीचा मित्र सचिन शिंदे याला त्याच्या मूळ गाव संभाजीनगर येथून अटक केली. विकीकडे असलेल्या ५०० रुपयांपैकी ३०० रुपये सचिनने मागितले होते, मात्र ते न दिल्याने सचिनने धारदार शस्त्राने विकीवर हल्ला केला ज्यात त्याचा मृत्यू झाला असे पाेलिसांकडून सांगण्यात आले.
COMMENTS