माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
अॅड. संग्राम नाथाभाऊ शेवाळे यांनी दिल्ली येथे भारताचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान अॅड. संग्राम शेवाळे यांनी लिहिलेल्या ’लंडन सफरनामा’ या पुस्तकाच्या प्रकाशन करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. तर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब यांनी अॅड. संग्राम शेवाळे यांना भेटी दरम्यान लंडन येथे घेत असलेल्या शिक्षणाविषयी माहिती विचारली. तसेच त्या ठिकाणी आलेले अनुभव याविषयी चर्चा करून मार्गदर्शन केले. व त्यांच्या ’लंडन सफरनामा’ या पुस्तकास शुभेच्छा दिल्या. व या पुस्तकाची भविष्यात परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे ठरेल असे गौरवउद्गार काढले. भविष्यकाळात आपल्या शिक्षणाचा उपयोग महाराष्ट्रातील जनतेसाठी करावा असे आवाहन केले.
अॅड. संग्राम शेवाळे यांनी उच्चशिक्षणासाठी (बॅरिस्टर) लंडन येथे गेले असता त्या ठिकाणी आलेल्या अनुभव व तेथील संस्कृती, ऐतिहासिक वास्तू, शिक्षण पद्धती, राजकारण, अर्थकारण, भारत व लंडन दोन देशांमध्ये असणारी विभिन्नता त्यांनी त्यांच्या लंडन सफरनामा या पुस्तकात दर्शवली आहे. अॅड. संग्राम शेवाळे हे कायदेविषयक शिक्षण घेण्यासाठी लंडन येथे गेले होते. या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथे दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी बालगंधर्व रंगमंच या ठिकाणी पार पडणार आहे.
COMMENTS