मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.
मुंबई | नगर सह्याद्री -
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरने स्विफ्ट डिझायर कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला आणि एका महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू झाला.
कारमधील अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कंटेनरच्या धडकेने मोठी कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अपघातानंतर स्थानिकांसह पोलिसही घटनास्थळी पोहोचले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांचा टप्पा सुरू आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास एक्स्प्रेस वेवर कार आणि कंटेनरमध्ये भीषण टक्कर झाली.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरच्या ड्राइवरचे नियंत्रण सुटले, त्यामुळे कंटेनर अनियंत्रित होऊन दुभाजक तोडून पुणे रस्त्यावरून आडवा पडला. त्याचवेळी पुणे रस्त्यातून जाणाऱ्या स्विफ्ट कारला या कंटेनरने धडक दिली
या भीषण अपघातात कार ड्राइवरसह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून कारमधील चार महिला गंभीर जखमी झाल्या आहे. अपघातानंतर महामार्गावर गाड्याच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले. सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
COMMENTS